हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका व्यक्त केली. “राज्याच्या दृष्टीने कृषी कायदा करणी महत्वाचे आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याचा मुद्दा आहे. राज्य सरकारला कृषी कायदा बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी फुलप्रूफ कृषी कायदा करावा,” अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
थोड्याचवेळात सुरु होणाऱ्या या अधिवेशनात अध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असले असे आम्हाला वाटते. मात्र, आज किती आमदार येणार त्यावर निर्णय होईल, असे पटोलेंनी म्हंटल आहे. दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मंत्री हजेरी लावू लागले आहेत. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोलेही उपस्थित राहण्यासाठी अधिवेशनाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना अध्यक्षपदाच्या निवडीबाबत माध्यमांनी विचारणा केली असता. त्यांनी विधानसभेत आमदार किती उपस्थित राहतात. त्यांच्या उपस्थितीनंतरच आज अध्यक्षपदाचा निर्णय अंतिम राहणार आहेत. त्यांच्यानंतरच काय तो निर्णय होईल, असे म्हंटले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष निवड व कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका यावेळी व्यक्त केली. त्यांच्यानंतर आता प्रत्यक्षात किती आमदार उपस्थित राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या पावसाळी आधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.