तौक्ते चक्रीवादळामूळे उडून गेला ‘टायगर ३’चा सेट; SKF प्रोडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. दरम्यान संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अनेक लोकांची घरे, मोठमोठ्या बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या चक्रीवादळात सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा कोट्यवधींचा सेट देखील उडून गेला आहे. याचा मोठा फटका सलमानला बसला आहे. त्याचा आगामी सिनेमा टायगर ३ लवकरच प्रदर्शित होणार होता. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला आहे. परिणामी सलमानच्या SKF प्रोडक्शनला कोट्यावधींचा फटका बसला आहे.

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचा पुढील भाग अर्थात सीक्वल टायगर ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमात सलमान सोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन सलमानने मुंबईत सेट तयार करुन घेतला होता. मात्र नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे हा संपूर्ण सेट उडून गेला आहे. त्यामुळे त्याचे व अर्थातच प्रोडक्शनचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे चित्रपटाचे शूटिंग करणे आता आणखीच लांबणीवर जाणार आहे. परिणामी सलमानच्या चाहत्यांना आता आणखी काळ या चित्रपटासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉण्डेट भाई’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट कोरोनामुळे थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘राधे’ या सिनेमावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तसा हा चित्रपट समीक्षकांना फारसा भावलेला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र नेहमीप्रमाणे भाईजानचा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

You might also like