वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून प्रत्येक घरामध्ये वाद असतात. यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अशीच एक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये वाटणीच्या वादातून जन्मदात्या आईने मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाने गावात राहणाऱ्या रतिलाल पाटील यांचा त्यांची आई आणि दोन बहिणींसोबत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून मागच्या अनेक वर्षांपासून वाद होता. या वाटणीवरून रतीलाल पाटील व त्यांच्या बहिणीमध्ये अनेक वेळा भांडणेदेखील झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीदेखील यांचा वाटणीवरून मोठा वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला कि रतिलाल यांची आई येडाबाई आणि दोन बहिणीसह त्यांच्या मुलांनी रतीलाल पाटील यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर रतीलाल यांच्या बहिणी व भाच्यांनी घरात घुसून रतिलाल यांचा मुलगा नितीन याला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नितीनला वाचवण्यासाठी रतिलाल मध्ये पडले तेव्हा त्यांनादेखील मारहाण करण्यात आली. यावेळी भाच्यांनी डोक्यावर लोखंडी रोडने मारहाण करत रतिलाल यांना गंभीर जखमी केले. यामध्ये भाचा हेमराज ठाकरे, व आई येडबाई रूपचंद अहिरे यांनी काठ्या व हाताबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण केली.

यानंतर या दोघांना सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. या उपचारादरम्यान रतिलाल अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी 8 संशयितांना ताब्यात घेतले आहे.यामध्ये ज्ञानेश्वर भगवान ठाकरे याने लोखंडी रॉडने नितीन व त्याचे वडील रतिलाल यांना मारहाण केली आहे. तर आत्या मंगलबाई भगवान ठाकरे, सरलाबाई संजय सावळे व संजय गोकुळ सावळे, दीपक संजय सावळे, ज्ञानेश्वर संजय सावळे, हेमराज भगवान ठाकरे, आई येडबाई रूपचंद अहिरे यांना या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.