परतीच्या पावसाने सोयाबीन उध्वस्त झाल्याने हताश होऊन शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात परतीच्या पावसाने सध्या थैमान घातले आहे. सध्या राज्यात सोयाबीन, कापूस, धान पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले आलेला घास हिरावून घेतला झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून कोणतिही मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखा (suicide) पर्याय वापरत आहेत.

अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. यामधील एका शेतकऱ्याने नुकसान झालेले पिक दाखवत सोयाबीनच्या ढिगाऱ्यासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली. संतोष अशोक दौंड असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेले सोयाबीन पीक डोळ्यादेखत परतीच्या पावसाने वाहून गेल्याने शेतकरी संतोष दौड हे नैराश्येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांने आत्महत्येचा (suicide) मार्ग स्विकारला.

राज्यभरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा शेतात सडत आहेत. इतर शेतकऱ्यांच्या शेतातही हीच स्थिती आहे. अशा स्थितीत आता पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय