घर बांधकामासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करणे ठरणार गुन्हा ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वीचा काळी सुरु असणारी लग्नात हुंडा मागण्याची प्रथा आता काहीशी बंद झाली आहे. हुंडा पद्धत बंद करण्यासाठी व यावरून शिक्षा करण्यासाठी त्याबाबत कायदेही तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने घराच्या बांधकामासाठी पतीने पत्नीकडे पैशाची मागणी केल्यास ते कारण हुंडा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. आणि त्यानंतर संबंधितावर गुन्हाही दाखल होणार आहे, असा आज निकाल एका प्रकरणात दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज हुंडाबळीच्या कायद्याअंतर्गत महत्वाचा निर्णय दिला असल्याने अनेक कारणांनी हुंडा मागणाऱ्यांवर आता या एका करणानेही गुन्हा दाखल करता येऊ शकणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता घर बांधकामांसाठी पत्नी कडे पैसे मागणे आता गुन्हा मानला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज हा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात हुंडा मागणीवरून एका महिलेला मारल्याचे एक प्रकरण आले होते. ते म्हणजे ट्रायल कोर्टाने कलम 304 -बी (हुंडा हत्या), आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ करणे या कलमांखाली एका महिलेचा पती आणि सासऱ्याला दोषी ठरवले होते. या प्रकरणात आरोपींनी महिलेकडे पैशाची मागणी करत तिचा छळ केला होता. आणि यातच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेचा पती आणि सासरा मृत महिलेकडे घर बांधण्यासाठी पैशाची मागणी करत होते. तिच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते.

अखेर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. यावर न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी विरोधात मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा, न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय देत हुंड्याची व्याख्या सादर केली. ‘हुंडा’ या शब्दाचे विस्तृत अर्थाने वर्णन केले पाहिजे, जेणेकरून एखाद्या महिलेची कोणतीही मागणी, मग ती मालमत्तेशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूचा समावेश करता येईल. असं मत त्याच्या खंडपीठाने यावेळी मांडले.