महाराष्ट्रात वाढतो आहे डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, आतापर्यंत झाले 3 मृत्यू

0
65
aurangabad corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिलेच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर आता रायगडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की,”मृत वृद्ध (69) रायगडमधील नागोठणे येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रात, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.”

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यूची होण्याची पहिली घटना कालच मुंबईत नोंदवली गेली. जुलै महिन्यात मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, ज्याचा रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्ट नुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महिलेचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महिलेचा मृत्यू झाला.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत तीन मृत्यू झाले आहेत. 13 जून रोजी 80 वर्षीय महिलेचा रत्नागिरीत पहिला मृत्यू झाला. मुंबई आणि रत्नागिरीतील मृत्यूंबाबत महाराष्ट्र सरकार अजूनही आपली रणनीती तयार करत होते. त्यातच रायगड जिल्ह्यातील 69 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की,”वृद्ध हे रायगडमधील नागोठणे येथील रहिवासी आहेत.”

महाराष्ट्रातील नाशिकमधील 30 लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची पुष्टी झाली
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव वाढताना दिसत आहे. राज्यातील नाशिकमध्ये 30 लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. सध्या हे नमुने जीनोम सिक्वन्सिंगसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत महाराष्ट्रात अनलॉकिंग सुरू आहे. राज्याच्या अनेक भागात निर्बंध शिथिल केले जात आहेत. ताज्या रिपोर् असेही म्हटले जात आहे की, राज्यात ‘आर’ देखील 1 पेक्षा जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here