भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा-तुमसर राज्य मार्गावर ट्रक-टिप्परमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रकचा चालक जिवंत जळाला आहे. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात (Accident) झाला. दुसऱ्या ट्रकच्या ड्राइवर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचा जीव वाचला आहे. दाबा गावाजवळ कोळसा भरून जात असलेला ट्रकला भरधाव येणाऱ्या टिप्पर ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने हा भीषण अपघात (Accident) घडला आहे.
ट्रक-टिप्परची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, आगीत ट्रक चालक जिवंत जळाला pic.twitter.com/k24z9SNGFR
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 6, 2022
हि धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर (Accident) स्पार्क होऊन कोळसा भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइवर बाहेर निघाला. मात्र टिप्पर ट्रक चे कॅबिन चेपल्याने ड्राइवर अडकून पडला. त्याला बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नव्हता. यामुळे दुर्दैवाने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातानंतर (Accident) कोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग टिप्पर ट्रकलाही लागली. बघता बघता आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत टिप्परमध्ये अडकलेला ड्रायवर जळून खाक झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वरठी पोलिस आणि अग्निशन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि हि आग विझवली. वरठी पोलिस या अपघाताचा (Accident) पुढील तपास करत आहेत.
कसा झाला अपघात?
ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात (Accident) झाला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोळशाने भरलेला ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला होता. तर समोरुन येणाऱ्या टिप्परलाही वळणावर अचानक ट्रक आल्यानं गाडी बाजूला घेण्यासाठी मार्ग उरला नव्हता. यामुळे एकाच लेनमध्ये समोरासमोर आल्यामुळे हा भीषण अपघात घडला. ट्रकच्या चालकानं प्रसंगावनधान राखल्यानं त्याला लगेचच गाडीतून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला मात्र दुर्दैवाने टिप्परचा चालकाचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार