एका महिलेने तिरंग्याला केले असे नमन आणि सलाम, व्हिडीओ झाला व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्वातंत्र्य दिन मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जगतो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी इतक्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही. कारण आपल्या देशातच नाही तर जगभरात कोरोनाच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे सगळ्या च गोष्टींवर परिणाम झाला आहे.

परवा साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर एक व्हिडीओ जबरदस्त वायरल झाला आहे. देशातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय इमारतींवर तिरंगा फडकावला जातो. भारता मध्ये सर्व जाती धर्माचे विविध लोक एकत्र राहतात. सर्व आपल्या पद्धतीने सण उत्सव साजरा करतात. पण राष्ट्रीय सण हा सर्व जण मिळून साजरा करतात. देशातल्या सर्व ठिकाणी तिरंगा फडकावला जातो. अश्याच एका स्त्रीने आपल्या तिरंग्याला देवाचे स्थान दिले आहे. सर्वसामान्य स्त्रीने रस्त्यावर जाताना तिरंगा पहिला आणि तिने आपल्या हातातील पिशवी बाजूला ठेवून , आणि रस्त्याच्या मधोमध चप्पल कडून ती तिरंग्याच्या जवळ गेली आहि मनोभावे नमस्कार केला. त्यातून तिने माघारी येऊन आपली चप्पल आणि बॅग घेऊन निघून गेली.

 

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी असलेले सुशांत नंदा यांनी त्याच्या अकॉउंट वरून शेअर केला आहे. अनेक लोकांनी त्याला लाइक आणि शेअर केला आहे. ८८ हजार यूजर नि अत्तापर्यंत हा व्हिडीओ पहिला आहे. अनेकांनी त्याच्यावर कंमेंट हि केल्या आहेत. एका यूजर ने म्हंटले आहे कि, काय विशेष आहे, या महिलेने पूजा करतात त्या पद्धतीने नमन केले आहे. दिल खुश हो गया , जय हिंद अश्या अनेक कंमेंट आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in