नवी दिल्ली । विराट कोहलीने टी -20 चे कर्णधारपद सोडल्याची बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला असेल, मात्र त्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना कोहलीने टी -20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्याविषयी सांगितले. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापासून, त्याची खराब फलंदाजी कामगिरी पाहता तो टी -20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होत होती. वर्ल्डकपचे सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, नवीन सिलेक्टर्स आणि कोचिंगमधील बदलांमुळे विराट कोहलीचे आव्हान वाढत होते. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरीजदरम्यान शिखर धवनला संघात घेण्यासाठी कोहलीला खूप संघर्ष करावा लागला. निवड समितीला विजय हजारे करंडकात चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीराला धवनच्या जागी घ्यायचे होते. मात्र कोहली धवनला संघात घेण्याच्या बाजूने होता.
पाच दिवस थांबावे लागले
भलेही यानंतर सिलेक्टर्सनी श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला संघाचा कर्णधार बनवले. मात्र मार्चमध्ये झालेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा आणि सहमती होण्यास 5 दिवस लागले. मात्र, कर्णधार आणि सिलेक्टर्समध्ये कोणताही वाद नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याला मार्चमधील हे प्रकरण अपवाद आहे. मात्र, कोहलीच्या जवळचे म्हणतात की,” कोहलीला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. BCCI ला फक्त कोहलीवर थोडा दबाव आणायचा होता.”
कोहलीला प्रत्येकाला पुरेसा वेळ द्यायचा होता
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी विराट कोहलीने BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन जय शाह, मुख्य सिलेक्टर्सशी भेट घेतल्यानंतर आपल्या निर्णयाबद्दल सांगितले होते. त्याने टी -20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याविषयी सांगितले, जेणेकरून सिलेक्टर्सना आणि बोर्डाला वेळ मिळेल. तर कोहलीने गुरुवारी कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले. यानंतर, जय शाह म्हणाले होते की,” RCB व्यतिरिक्त कोहली वनडे संघाचे कर्णधारपदही कायम ठेवेल.”