.. मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?; काँग्रेसकडून टीकेची झोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण होत असताना दुसरीकडे कोरोना लशीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियात टाकल्यानंतर काँग्रेसने भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते. असे असेल तर .. मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसने भाजप व फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते. मात्र तन्मय फडणवीस यांना कोरोना लस दिल्याचा फोटो व्हायरल झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

सचिन सावंत यांनी केलं ट्विट

“बाअदब बामुलायचा होशियार शहेनशाह ए हिन्द आलमपनाह नरेंद्र मोदी जी के शागिर्द और मोदीया सल्तनत के सिपासालार देवेंद्र फडणवीस जी के भतीजे नवाबजादे तन्मय फडणवीस जी वैक्सीन लेने पधार रहे हैं।

कोई न पुछो उनसे उमर। फडणवीस जी की लगी है जो मुहर। उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है”‘ असं ट्विट करत तन्मय फडणवीस यांच्या लस घेण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं म्हटलंय की, ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच तन्मय फडणवीस ४५ वर्षापेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने विचारली आहे.

 

 

Leave a Comment