हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आयुन या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी देखील विरोधकांवर पलटवार करत माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सर्व पक्षांचं एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असंही त्यांनी अधोरेखित केलं आणि आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही. भाजपला हरवायचं यावर आघाडीचं एकमत आहे. ज्या ज्या महानगरपालिकेबाबत काय निर्णय घ्यायचा ते सर्वानुमते घेऊ. अ ब आणि क महापालिकेत किती वॉर्ड असावेत वगैरे ही चर्चा सुरू आहे. काहीच अंतिम निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.