हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे.
अलीकडेच ज्या बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले आहेत त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. आज आपण फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत…
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाकडून जास्त व्याज देणारी ‘स्टार सुपर ट्रिपल सेव्हन फिक्स्ड डिपॉझिट’ योजना देखील सुरू केली आहे. या नव्या एफडीमध्ये गुंतवणूकदारांना 777 दिवसांसाठी पैसे जमा करता येतील. यामध्ये बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% दराने व्याज दिले जाईल.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियानेही फिक्स्ड डिपॉझिट्ससाठीचे व्याजदर वाढवले आहेत. आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3 टक्के ते 7 टक्के पर्यंत व्याज दर देत आहे. FD Rates
कॅनरा बँक
कॅनरा बँकेकडून नुकतेच 666 दिवसांची स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स सुरू केली आहे. यामध्ये पैसे जमा करणाऱ्या सामान्य ग्राहकांना वार्षिक 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. FD Rates
बँक ऑफ बडोदा
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँक ऑफ बडोदाने 1 नोव्हेंबरपासून बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 399 दिवसांच्या FD वर 7.50 टक्के दराने व्याज मिळेल. मात्र ही स्कीम 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या रिटेल टर्म डिपॉझिट्ससाठी असेल. बँक ऑफ बडोदाने नॉन-कॉलेबल रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील प्रीमियम वार्षिक 0.15% वरून 0.25% पर्यंत वाढवला आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा