नवी दिल्ली / लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर भर देण्याला आला आहे.
जन आवाज असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ असं लिहिण्यात आलं आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी ,गरिबीवर वार,रोजगार, मनरेगा, शिक्षण -आरोग्य या गोष्टींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण मुद्दे –
– शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट मांडणार असल्याचे राहुल गांधींनी या जाहीर नाम्यात म्हणले आहे.
– देशातील 20 टक्के गरिंबासाठी किमान वेतन आधारित न्याय योजना आणण्याची घोषणा केली.
– गरिबांच्या खात्यात दरमहा 6 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 72 हजार रुपये देण्यात येतील.
– 22 लाख रोजगार देऊल तसेच 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करुन देऊल.
– तरुणांना उद्योगांसाठी तीन वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
– महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत देण्यात येणारा रोजगाराचा कालावधी 100 वरुन 150 करण्यात येईल.
– शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही.
– जीडीपीच्या 6 टक्के खर्च शिक्षणावर करण्यात येईल.
– गरिबांनाही चांगल्या दर्जाच्या रुग्णालयात उपचार मिळतील.
इतर महत्वाचे –
नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हाडांच्या कारखान्यावर कारवाई
भाजपला ठेचायचे असेल तर आम्हाला डिवचू नका, प्रेमाने वागा
प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासूनच भाजपला विकले गेले आहेत – पृथ्वीराज चव्हाण