नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणा बाबत (privatisation) सरकार बरोबर चर्चा करीत आहोत. या संदर्भातील ही प्रक्रिया पुढे केली जाईल. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात शक्तीकांत दास म्हणाले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) खाजगीकरणाबाबत सरकारशी चर्चा करीत आहोत आणि या संदर्भातील ही प्रक्रिया लवकरच पुढे नेली जाईल.
ही प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आहे
सूत्रांच्या माहिती नुसार, सरकारी बँकांचे खासगीकरण आता फास्ट ट्रॅकवर आहे. नीति आयोगाने बँकांच्या खासगीकरणाचा अहवाल तयार केला आहे. यात पहिल्या टप्प्यातील खासगीकरणासाठी बँकांची नावे निवडणे शक्य आहे. अन्य माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने 4 सरकारी बँकांना शॉर्टलिस्ट केले आहे, असे म्हटले जात आहे की, यापैकी दोन बँकांचे पुढील आर्थिक वर्षात खाजगीकरण केले जाईल. खासगीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओवरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावाची चर्चा आहे. परंतु, अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.
खासगीकरणाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली
सरकारने अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या लिस्ट मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाया नावांची चर्चा आहे. खाजगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण प्रस्तावित केले.
बँक संघटना संपावर आहेत
सरकारवर या प्रस्तावापासूनच बँक संघटना आणि विरोधी पक्षातील विविध नेत्यांकडून याबाबत बरीच टीका केली जात आहे. बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक संघटनांनी 15 आणि 16 मार्च रोजी अलीकडेच दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला होता आणि पुढील संपाचा धोकाही होता. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी करून ग्राहकांवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. बँकेच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत”.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा