नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये सध्या चोरटयांनी (theft) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. हे चोरटे (theft) सर्रास चोरी करताना तुम्हाला दिसतात. अनेकदा या चोरीच्या (theft) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते. अशीच एक घटना सीबीडी बेलापूरमध्ये घडली आहे. यामध्ये चार घरांमध्ये घरफोडी झाली आहे. या घरफोडीमध्ये या चोरटयांनी (theft) लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.
नवी मुंबईत चोरट्यांचा हैदोस, सीबीडी बेलापूर येथे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #thief #crime #newmumbai pic.twitter.com/4IjUZ9zits
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) October 4, 2022
तसेच त्यांनी सोन्या- चांदीचे दागिने पैसे देखील लंपास केले आहेत. यामध्ये परदेशातील नोटांचा देखील समावेश आहे.हि संपूर्ण चोरीची (theft) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्हीमध्ये या चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. पोलीस त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे घरफोडी किंवा चोरीची (theft) नवी मुंबईतील ही पहिली घटना नाही. याआधी देखील अशा अनेक घटना वारंवार घडल्या आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे एव्हढी चोरी करण्याचं धाडस तरी करतात कसं? त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती