सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
काही कामानिमित्त साताऱ्यात आलेल्या महिलेची सॅक चोरुन त्यातील तब्बल दीड लाखांचे सोने आणि अन्य वस्तू लंपास करणाऱ्या चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी तीन इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून गुन्हयातील 1,51,000/- रु.किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आसमा रशिद शेख रा.तामजाईनगर सातारा या त्यांच्या कामानिमित्त शाहू स्टेडीयम सातारा येथे गेल्या होत्या, तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची सॅक चोरली. त्यामध्ये 1,56,000/-रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल हॅन्डसेट व इतर साहीत्य होते. त्याबाबत दि. 22/08/2021 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं.320/2021 भा.दं.वि.सं.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी मा.समीर शेख पोलीस अधिक्षक, सातारा. मा. अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती आँचल दलाल सहा. पोलीस अधीक्षक यांनी शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री. संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हयातील आरोपीचा नाव, पत्ता निष्पन्न केला व सदर गुन्हयातील दोन आरोपींचा शोध घेवून त्यांना दि.04/11/2022 रोजी ताब्यात घेतले.
सदर आरोपीकडे कौशल्याने तपास करुन त्यांच्याकडून गुन्हयातील मोबाईल हॅन्डसेट, चार्जर, पेनड्राईक असे साहीत्य जप्त करणेत आले. त्याच्याकडे सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारपुस केली असता सदर आरोपीने हे दागिने सातारा शहरातील एका सोनाराकडे विकले असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सोनारास ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली. त्याने सदर दागिन्यांची लगड तयार केल्याने त्याचेकडुन लगड जप्त करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींकडून गुन्हयातील 1,51,000/- रु. किं.चा ऐजव हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पो. हेड. कॉ. चंद्रकांत माने हे करीत आहेत.
अशा प्रकारे एका महीलेची दागिने असलेली सॅक चोरुन नेलेचा गुन्हा शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघड करुन त्यामध्ये सोनारासह तीन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील 1,51,000/- रु. किं.चा ऐवज हस्तगत केला आहे. सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक, सातारा, मा. अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती आँचल दलाल सहा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, स.पो.नि. प्रशांत बधे, पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. स्वप्निल सावंत, सचिन पवार, पो.हे.कॉ. चंद्रकांत माने यांनी केली आहे.