हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने फेटाळला असला तरी अजूनही या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता पवारांचा निवृत्तीचा निर्णय म्हणजे पावर गेम आहे, पवारांनी मास्टरस्ट्रोक दिला आहे. मी म्हणजेच राष्ट्रवादी हे त्यांनी दाखवून दिले असं विधान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. तुम्ही माना किंवा न माना परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गावातील कार्यकर्त्यापासून ते देशभरातील नेत्यांपर्यंत सगळे खडबडून जागे झाले. आपण जर काही गडबड केली तरी काही होणार नाही असं ज्यांना वाटत होते त्यांना हा स्ट्रोक बसला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील सर्वाना नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे सिद्ध करून दिले आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार राजकारणात काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
अजित पवार आणि त्यांच्या गटाला अडकवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले?
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/KQtIZpIxai#Hellomaharashtra #SharadPawar #AjitPawar #SharadPawarResigns
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 4, 2023
ते पुढे म्हणाले, मी जर निर्णय घेतला तर तुमच्या सर्वांच्या अंगलट येऊ शकतो आणि कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे. मी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे शरद पवारांनी जगजाहीर करून टाकलं. पवारांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि आक्रोश आता बघितला आहे त्यामुळे कोणता वेगळा निर्णय घेतला तर तो कार्यकर्त्याच्या विरोधातील निर्णय असेल त्यामुळे राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. असेही शिरसाट यांनी म्हंटल.