देशासाठी पदक जिंकणाऱ्या ललिता बाबरचा एक वर्षांचा मुलगासुद्धा ‘कोविड योद्धा’ बनतो तेव्हा..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या तुलनेत महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक आहे. प्रशासन उपाययोजना राबवत आहे. उपाययोजनांसाठी राज्य सरकारने जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या निधीतून जमा होणारी रक्कम कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केला जाणार आहे.अनेकांनी यामध्ये मदत केली आहे. आता या यादीत महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर आणि तिचे पती महसूल सेवेत असणारे डॉ संदीप भोसले यांचेही नाव आले आहे. त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी या दाम्पत्याने ५०,०००रु मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत.

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून असलेल्या ललिता बाबर या रिओ दि जेनेरिओ समर ऑलिम्पिक मध्ये ३२ वर्षांमध्ये निवड झालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. या ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी ९:२२:७४ या वेळेसह १०वे स्थान पटकावले होते. २०१५ साली एशिया चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. ऍथलेटिक्स मधील योगदानाबद्दल २०१६ साली तिला राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्कार देऊन गौरवीत केले होते.

 

महाराष्ट्राच्या छोट्या गावातून येऊन ऑलिम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू म्हणून महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. या संकटकाळात राज्याच्या मदतीसाठी त्यांनी दिलेल्या रकमेमुळे त्यांची समाजप्रती असणारी बांधिलकी ही दिसून येते आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानून त्यांचा मुलगा रुद्रप्रताप याला मुख्यमंत्र्यांनी शुभाशीर्वाद दिले आहेत. दरम्यान राज्यातील रुग्णांची संख्या ४४ हजार पार झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.