हा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता चक्री वादळाचा तडाखा बसू लागला आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी भाजपकडून वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी ठाकरे सरकार अशा दोन्ही सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट करीत ठाकरे सरकारवर झरी टीका केली आहे. तौते चक्री वादळाचा संबंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारशी त्यांनी जोडला आहे. ‘हा तर पनवतींचा बाप आहे’, असा उल्लेख करणारे ट्विट राणेंनी केले आहे.

तौते चक्रीवादलामुळे राज्यावर निसर्गनिर्मित संकट आल्याने यातून जास्तीत जास्त नुकसान न होऊ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र, या चक्री वादळाचा फटका बहुतांश कोकण किनारपट्टीसह मुंबई व राज्यातील अनेक जिल्ह्याना बसला आहे. या वादळापासून होत असलेल्या नुकसानीवरून भाजपचे आमदार नितेश राणेंनी एक ट्विट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांच्या ट्विटमुळे पून्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष. २०२० चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), २०२१ चक्रीवादळ. २०२० आणि २०२१मध्ये करोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर पनवतींचेही बाप आहेत, बॉस,” अशी टीका राणे यांनी केली आहे.

Leave a Comment