.. म्हणून IAS अधिकाऱ्यानं बारावीत काठावर उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका केली ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका IAS अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणली आहे. सध्या ही गुणपत्रिका आणि त्यासोबत नितीन संगवान यांनी दिलेला संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सीबीएसईच्या बारावी इयत्तेतील २००२ या वर्षासाठीची IAS अधिकारी असलेल्या नितीन संगवान यांची गुणपत्रिका पाहता ते अक्षरश: काठावर उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली आहे. केमिस्ट्री या विषयात त्यांचे गुण घसरल्याचं या गुणपत्रिकेत पाहायला मिळत आहे. आपल्या या गुणपत्रिकेविषयी त्यांनी लिहिलं, ‘बारावी इयत्तेमध्ये मला केमिस्ट्रीमध्ये २४ गुण मिळाले होते. उत्तीर्ण होण्यासाठीच्या अपेक्षित गुणांपेक्षा अवघा एक गुण जास्त. पण, मला जीवनात काय साध्य करायचं होतं, हे काही या गुणांना ठरवता आलं नाही. त्यामुळं आपल्या पाल्यांवर गुणांच्या अपेक्षेचं ओझं देऊ नका. बोर्डाच्या या निकालांच्या पलीकडेहील एक सुंदर आयुष्य आहे’.

सोशल मीडियावर खुद्द IAS अधिकाऱ्यांकडून स्वत:चंच उदाहरण देत सर्वांपुढं ठेवलेला आदर्श पाहता नेटकऱ्यांनीही त्यांच्या हा विचार पटतं आहे. अनेकांनी त्यांचं हे ट्विट रिट्विटही केलं. तेव्हा गुणपत्रिकेवर छापलेल्या आकड्यांवरुन अर्थात गुणांवरुन कोणा एकाची गुणवत्ता किंवा त्याच्या / तिच्या भवितव्याचे तर्क लावण्याचा व्यर्थ प्रयत्न करत विद्यार्थ्यांचं खच्चीकरण केलं जाणार नाही याचीच काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment