हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार हे बंड करून भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावर शरद पवार नाराज आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र करतील का? तसेच, पवार कुटुंब दिवाळीनिमित्त तरी पुन्हा एकत्र येईल का? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतु याबाबत थेट अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यंदाच्या दिवाळीत मला सर्वांना भेटता येणार नाही अशी माहिती दिली आहे. अजित पवार यांना डेंगूची लागण झाली आहे. ज्यामुळे त्यांना दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता येणार नाही.
यंदा पक्षफुटीनंतर पवार कुटुंब पहिली दिवाळी साजरी करत आहेत. परंतु अशा काळात अजित पवार यांना डेंगू झाल्यामुळे त्यांना पवार कुटुंबाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग नोंदवता येणार नाही. सध्या अजित पवारांना डेंगू झाल्यामुळे त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरवर्षी पवार कुटुंब किती व्यस्त असले तरी दिवाळीनिमित्त सर्वजण गोविंद बागेत भेटतात. मात्र यावर्षी कुटुंबाची ही परंपरा खंडित होणार आहे. कारण, या दिवाळीत प्रकृती ठीक नसल्यामुळे अजित पवार यांना गोविंदा बागेत येता येणार नाही. याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली आहे. त्यांनी म्हणले आहे की, यंदाच्या दिवाळी आजारपणामुळे मला सर्वांपासून दूर राहावे लागत आहे. परंतु माझ्या सदिच्छा सदैव तुमच्यासोबत असतील.
https://www.facebook.com/100044288896694/posts/pfbid0tWUXpTUjvrmESNuSwKEvuC27x3fgamRZo3872ra72bX6SuCDvsr57VieZrt4a8oal/?app=fbl
दरम्यान, मधल्या काळात अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे शरद पवार यांनी देखील आगामी निवडणुकांचा विचार करून पक्ष बांधण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे हे दोघेजण पुन्हा एकत्र येतील अशी चिन्ह लांबपर्यंत दिसत नव्हती. परंतु या काळातच दिवाळी आल्यामुळे पवार कुटुंब नाती जपत पुन्हा एकत्र येईल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र आता या आशेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, अजित पवार यांना डेंगू झाल्यामुळे ते दिवाळी साजरी करू शकतात नाही. यामुळे फक्त यंदाच्या दिवाळीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असतील असे म्हटले जात आहे.