मुंबई आझाद मैदान येथे हजारो शिक्षकांचे जवाब दो आंदोलन सुरु

0
70
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मुंबई आझाद मैदान येथे दि (२९) जानेवारी पासुन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत: अनुदानित व अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे.

13सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार घोषीत अनुदान मंजुर 20%,व वाढीव 40% वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने तात्काळ काढावा, व सर्व अघोषित शाळा कॉलेज निधीही घोषीत कराव्यात या मागणीसाठी हजारो शिक्षक आझाद मैदान जवाब दो बेमुदत धरणे आंदोलन तिन दिवसा पासुन बसले आहेत.

मागील शासनाने 13,सप्टेंबर 2019 ला शासन आदेश काढून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. तसेच सोबतच ज्या प्राथमिक माध्यमिक शाळा, 20% वेतन घेत होत्या त्यांना वाढीव 40% वेतन मंजुर केले, नंतर सत्तांतर झाले.व महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले या महाविकास आघाडी शासनाने पण दि २४ फेब्रुवारी २०२०च्या बजेट अधिवेशनात वेतनासाठी लागणार्या निधीची पुरवणी सभागृहासमोर मंजुर केली, २० वर्षापासुन विनावेतन वेठबिगाराच जिवन जाणार्या शिक्षकांना हा निर्णय संजिवनी देणारा ठरला, परंतु लवकरच राज्यात कोवीड १९ चा कहर सुरु झाला, व शासनाने शिक्षकांचे मंजुर वेतन कोरणाचे कारण पुढे करत टाळले, या मुळे २० वर्षापासून वेतनाची वाट पाहणार्‍या शिक्षकांचा पुन्हा भ्रमनिरास झाला, या धक्क्याने राज्यात लाँकडाऊन काळात २९ विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या व हार्ट अट्याकने आपले प्राण सोडले, तरी शासनाला कदर आली नाही,या नंतर शासनाने वेळकाढू पणा करत मा बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटी समिती नेमली, व अर्थखात्याचे तपासणीचे अधिकार रद्द केले व शिक्षणखात्याला तपासणीचे अधिकार दिले,परंतु प्रचलित अनुदानाची मागणी समितीने केली होती ती कॅबिनेटने नाकारली, १४आक्टोबर २०२० च्या कॅबिनेट ने १ एप्रिल २०१९चे २०% व ४०% वेतन हे १नोव्हेबर पासुन देऊ केले, या मधे १९ महिन्याच्या वेतनाला कात्री लावण्याचे काम शासनाने केले,

१३ सप्टेंबर २०१९नुसार १४६+ १६३८ उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना २०% अनुदान मंजुर करण्यात आले, यावर ९८८४ शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून २४ फेब्रुवारी २०२०रोजी पुरवणी मागणी द्वारे निधीची तरतूद झालेली आहे मात्र १४ आक्टोंबर २०२० रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत या शिक्षकांबरोबर धोका करत १९ महिन्याचा पगार कमी करत १ एप्रिल २०१९ ऐवजी १नोव्हेंबर २०२० पासुन वेतन अनुदानाचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला, पुरवणी मागणी मंजुर होण्याअगोदर तपासणी झालेली असताना पुन्हा तपासणीचा घाट घातला व १ डिसेबंर २०२० ते २२ जानेवारी २०२१च्या दरम्यान सर्व महाराष्ट्रातील शाळा काँलेजची पुन्हा मंत्रालयान स्तरावरुण तपासणी पुर्ण केली, असुनही वेतन अनुदान वितरणाचा शासन आदेश निर्गमित करण्यास शासनाकडून विलंब केला जात आहे,१३ सप्टेंबर २०१९ नुसार, २०%अनुदान घेत असलेल्या प्राथमिक,माध्यमिक शाळांना १ एप्रिल २०१९ पासुन वाढीव ४०% अनुदान देण्याचा निर्णय सुध्दा १४ आक्टोंबर २०२०च्या कॅबिनेट ने बदलला व १ नोव्हेंबर २०२० पासुन अनुदान मंजुर करुण यातही १९ महिन्याच्या पगाराला हरताळ फासण्यात काम शासणाने केले, यात १९ सप्टेंबर २०१६ नुसार २०% मंजुर १६२८ शाळा व २४५२ वर्ग तुकड्या व ९ मे २०१८ नुसार ७७९शाळा व वर्ग तुकड्या यांना ४०% वाढीव अनुदान मंजुर केलेले आहे, तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सर्व स्तरातून तपासणी होऊन पुणे व मुंबई येथे घोषीत होण्यासाठी पोहचलेल्या आहेत त्यालाही शासनाने तरतुदीसह घोषीत करण्यास विलंब करत आहे.

या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक घोषीत अनुदान मंजुर २०% व ४०% लागणाऱ्या निधीचे टोकन टाकलेले आहे, तसा उल्लेख दि १ डिसेंबर २०२० ला निर्गमित केलेल्या शासन निर्णयात केलेला आहे, बजेट अधिवेशन व मागील हिवाळी अधिवेशनात दोन सभागृहात शिक्षणखात्याकडून सांगितले गेले की जानेवारी महिन्यात या शिक्षकांच्या खात्यात पगार जमा केला जाईल परंतु सर्व तपासण्या पुर्ण झालेल्या असुन शासन विनाकारण दिरंगाई करत आहे, सभागृहात सुध्दा शासन खोट बोलु शकते हे या वरुण सिध्द होत आहे, या २०% व वाढीव ४०% शिक्षकांवर या पुरोगामी महाराष्ट्रात हा अन्याय होत आहे,हि लाजिरवाणी बाब आहे, यामुळे शसणा विषयी कमालीचा रोष या विनाअनुदानित शिक्षकांमधे निर्माण झाला आहे, तात्काळ वरील मागण्या मंजुर करुण वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने निर्गमित करावा ,याच रास्त मागणीसाठी हे ४५ हजार शिक्षक की जे गेल्या २० वर्षापासुन विनाअनुदानित काम करत आहेत, ते या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २३ शिक्षक संघटना एकत्रीत येत सर्व शिक्षकांमिळुन आझाद मैदानात दि २९ जानेवारी पासुन जवाब दो, बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत तिन दिवस झाले पण शासनाने कुठलीही दखल अजुन घेतली नाही.त्यामुळे १ फेब्रुवारी पासून पाच शिक्षक उपोषणाला बसणार आहे ,तरी जो पर्यंत आमच्या मागण्या मंजुर होणार नाहीत तो पर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार बोलताना आंदोलनाचे समन्वयक, सौ,नेहाताई गवळी, प्रा दिपक कुलकर्णी, श्री के पी पाटील, प्रा संतोष वाघ, श्री शिवराम म्हस्के, प्रा राहुल कांबळे,श्री ज्ञानेश चव्हाण, प्रा कर्तारसिंग ठाकुर, श्री ज्ञानेश्वर शेळके , हनुमंत बिनवडे, रविकांत जोजारे, यांनी व आंदोलन करत्या शिक्षकांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here