सोलापूर प्रतिनिधी | आषाढी एकादशी साठी आता पंढरपूरातील मठ, धर्मशाळा येथे वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. जर कोणी आढळले तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पंढरपूरात भाविकानी येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी १ जुलै रोजी पंढरपूरात होत आहे. सर्वात मोठ्या आषाढी एकादशी साठी पंढरपूरात वास्तव्य करण्यासाठी अनेक भाविक येथील मठ, धर्मशाळा मध्ये राहत असतात. पण यंदा कोरोना ने सर्वच थांबवले आहे.
एकादशी साठी पंढरपूरात येऊन मठात आणि धर्मशाळेत वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. याचाच भाग म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूरातील 350 ते ४५० मठ आणि धर्मशाळाना तशा सूचना दिल्या आहेत. सोबतच नगरपरिषदेचे कर्मचारी प्रत्येक मठात जाऊन तेथील खोल्यांची तपासणी सुध्दा करत आहेत.
जर मठात धर्मशाळेत पंढरपूर बाहेरील कोणी व्यक्ती वास्तव्यास आढळली तर संबधित व्यक्तीसह मठ, धर्मशाळा यांच्या वर सुध्दा कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.