Wednesday, February 8, 2023

सरकारी बंगला ‘चित्रकुट’वर ३ कोटींचा खर्च? धनंजय मुंडेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

- Advertisement -

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांचे नुतनीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर तीन कोटी ८९ लाख रुपये खर्च झाल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, याबाबत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्याला निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ आठ दिवस झाले असून, तिथे मी एक रुपयाही खर्च केला नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात नवे सरकार आल्यानंतर त्या सरकारमधील मंत्री आपापल्या सोयीनुसार व आवडीनुसार शासकीय बंगल्यांमध्ये व कार्यालयांमध्ये बदल करत असतात. त्यावर खर्चही बराच होतो. मात्र, यावेळी करोनाचे संकट असल्यानं राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही. मात्र, मंत्र्यांचे बंगले व दालनांची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून त्यांची देयकेही दिली जात असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’