बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी दुपारी गिट्टी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बुलडाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 653 वरील मढ फाट्याजवळ एक भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
या अपघातात (accident) पानवड येथील ज्ञानेश्वर सुरोशे यांच्यासह 11 वर्षीय आणि 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर वनिता ज्ञानेश्वर सुरोशे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले आहे. महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.
औरंगाबादला आपल्या गावी जात असताना टिप्परने दुचाकीला उडवले
दुचाकीवर स्वार असलेले 4 जणांपैकी पती, पत्नीसह त्यांचे नातेवाईक असलेली दोन मुलं हे कोलवडवरुन औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या पानवडद या गावी जात होते. यावेळी बुलडाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या दुचाकीला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात (accident) इतका भीषण होता कि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली.
हे पण वाचा :
सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या
डिजिटल पेमेंट करण्यासाठी Google Pay शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल