TikTok vs YouTube | टिकटाॅक चे रेटिंग ४.७ वरुन थेट २ वर कसे घसरले? जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरवर गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटाॅकच्या चाहत्यांमध्ये एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. युट्यूब आणि टिकटॉकवर भारी कोण आहे याबद्दल हे वाकयुद्ध सुरु आहे ? एक बाब हि आहे की गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग सध्या ४.७ वरून २ वर आले आहे. तसेच,काही युझर्सनी गूगल प्ले स्टोअरवर या टिकटाॅकला एकच रेटिंग दिले आहे.

सोशल मीडियावरही बर्‍याच युझर्सकडून भारतात टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली जात आहे. गुगल प्ले स्टोअरच्या म्हणण्यानुसार, टिकटॉकला आतापर्यंत सुमारे २४ दशलक्ष युझर्सकडून रेटिंग मिळाले आहे, त्यापैकी बऱ्याच युझर्सकडून या अ‍ॅपला केवळ एकच रेटिंग दिले आहे, ज्यामुळे या अ‍ॅपच्या रेटिंगमध्ये मोठीच घसरण होऊन केवळ दोनच झाले आहे.

त्याचवेळी सुमारे ७ लाख २२ हजार युझर्सनी टिकटॉकच्या लाईट व्हर्जनला रेटिंग दिलेले आहे. त्याच्या लाईट वर्जनचे रेटिंग हे फक्त १.१ इतकेच झालेले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की YouTube प्ले यूट्यूब अ‍ॅपला सुमारे ७० दशलक्ष लोकांनी रेटिंग दिली आहे.

युट्यूब-टिकटॉक दरम्यान का सुरू झाली फाईट ?
गेल्या कित्येक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटॉकच्या चाहत्यांमध्ये भांडण सुरू आहे. यामध्ये यूट्यूब युझर्स हे टिकटॉक युझर्सची तर टिकटॉक युझर्स हे यूट्यूबच्या युझर्सची चेष्टा करताना दिसतात. हे प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकीने यूट्यूबर्सची खिचाई करणारा एक व्हिडिओ बनविला. त्याने यूट्यूबवर कॉमेडी करणाऱ्यांची खूपच उडविली.

मात्र त्याच्या या व्हिडीओ नंतर गप्प बसतील ते यूट्यूबर्स कसले. यूट्यूबवर कॅरी मिनाटी नावाने एका अकाउंटमधून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला, ज्यात त्याने या टिकटॉक स्टार्सची फारच वाट लावली आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचला. यानंतर ट्विटरवरदेखील या वाकयुद्धाला सुरुवात झाली. येथे हजारो लोकांनी मीम्स शेअर करुन एकमेकांवर आपला राग व्यक्त केला. याचा परिणाम असा झाली की, ट्विटरच्या ट्रेंडमध्ये टिकटॉक, यूट्यूब आणि स्कर्टचे वर्चस्व राहिले.

TikTok vs YouTube: CarryMinati roasts Tiktoker Amir Siddiqui ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.