नवी दिल्ली । कोविड-19 वरील सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी मंगळवारी IIT च्या त्या कोरोना मॉडेलच्या अंदाजाला योग्य असल्याचे सांगितले, ज्यात नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येईल असे म्हटले गेले होते. ही लाट जानेवारीमध्ये शिखरावर पोहोण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष अरोरा म्हणाले, “IITs च्या मॉडेलिंगवरून असे दिसून येते की, येत्या काळात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढतील, जे प्रत्यक्षात घडत आहे.”
या आठवड्याच्या सुरुवातीला, IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले होते की,” दिल्ली, मुंबई, कोलकाता येथील कोविडची प्रकरणे जानेवारीच्या मध्यापर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे.” ते म्हणाले, “मात्र, प्रकरणांमध्ये घटही तितक्याच वेगाने होईल आणि मार्चपर्यंत ती जवळजवळ संपेल. मात्र, त्यांनी असेही सांगितले की,”यावेळी संसर्गाची संख्या दुसर्या लाटेदरम्यान संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त असू शकेल.”
208 दिवसांत कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे
गेल्या दोन आठवड्यांपासून देशात Omicron च्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. मंगळवारीच, भारतात कोरोना विषाणूचे 1,68,063 नवीन रुग्ण आढळले, ज्यामुळे देशातील कोविड-19 प्रकरणांची एकूण संख्या 3,58,75,790 झाली. यासह, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 8,21,446 वर पोहोचली आहे, जी गेल्या 208 दिवसांतील सर्वाधिक आहे.
अरोरा यांनी संसर्ग रोखण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला
संक्रमणाच्या वाढीदरम्यान, अरोरा यांनी वृत्तसंस्था ANI ला सांगितले की, योग्य कोविड वर्तन आणि लसीकरण कव्हरेज हे त्याचा प्रसार रोखण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक आहेत. “यासाठी कर्फ्यूसारख्या प्रशासकीय उपाययोजना देखील मदत करतील,” ते म्हणाले.
नवीन व्हेरिएन्टविषयी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की,”कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टचे 3 ते 4 उप-वंश आहेत. जेव्हा उपायाचा विचार केला जातो, तेव्हा या उप-वंश भिन्न असू शकतात, मात्र त्यांचे वर्तन एकसारखेच आहे.”