आज जागतिक महासागर दिन; ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही यंदाची थीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे महासागरांमध्ये सामावलेलं असल्याची माहिती शालेय शिक्षणातून मिळाली होती. महासागरांचा विचार करत असताना या पाण्यामध्ये अधिवास करणारे जलचर, या पाण्याचं सांडपाणी आणि घातक कचऱ्यापासून करावं लागणारं संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात.

युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण आणि विकास या विषयावर १९९२ साली झालेल्या जागतिक परिषदेत ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बहुतांश देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही, परंतु २००८ साली पुन्हा झालेल्या परिषदेत युनायटेड नेशन्सने २००९ पासून सर्वत्रच ८ जून हा जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं.

हा दिवस साजरा करण्यासाठी जगातील अनेक संघटना एकत्र येतात. यंदा मात्र कोरोना संकटाच्या धास्तीने ऑनलाईन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. समुद्रांचं प्लास्टिक कचऱ्यापासून संरक्षण करणे, दूषित पाण्याचं प्रमाण कमी करणे, कमी होणाऱ्या पाण्याच्या साठ्यांवर गांभीर्याने विचार करणे, समुद्री जैवविविधतेचं रक्षण करणे हा उद्देश केंद्रस्थानी मानून यंदाच्या वर्षीची थीम ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही ठेवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.