हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये यांच्या किंमती स्थिर आहेत. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर 73.56 रुपये आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.56 रुपये आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 80.11 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.05रुपये तर डिझेल 77.06 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.86 रुपये प्रति लिटर आहे.
नोएडा – पेट्रोल 81.14 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.69 रुपये तर डिझेल 74.03 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ – पेट्रोल 81.04 रुपये तर डिझेल 73.77 रुपये प्रतिलिटर आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 78.72 रुपये प्रति लिटर आहे.
जयपूर- पेट्रोल 87.60 रुपये तर डिझेल 82.62 रुपये प्रतिलिटर आहे.
आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या
तुम्हाला एसएमएसद्वारेही पेट्रोल आणि डिझेलची किंमत कळू शकते. इंडियन ऑयलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपी आणि आपल्या शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.