आज बँकांच्या खाजगीकरणाचा पहिला टप्पा, ‘या’ बँकांचा यादीत समावेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दोन सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकार्‍यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये खाजगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांकडून चर्चा होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच PSB ची शिफारस नीती आयोगाकडून करण्यात आली आहे आणि या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल.

बिजनेस स्टॅंडर्ड च्या अहवालाच्या नुसार निती आयोगाने 45 बँकांची शिफारस केली आहे. अशी माहिती मिळते आहे की या बैठकीत या दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल खाजगीकरणाच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक,बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक या बँकांच्या नावाची चर्चा आहे. आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्स मध्ये उसळी

मंगळवारी या बँकांच्या शेअरमध्ये देखील उसळी पाहायला मिळते आहे BSE मधील माहितीनुसार अनेक डील्स अंतर्गत एका लाखापेक्षा अधिक शेअर्सना बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्‍क्‍यांची उसळी पाहायला मिळाली.

दरम्यान देशात सध्या 12 सरकारी बँक आहेत. अहवालाच्या आधारे खासगीकरणाच्या यादीत एसबीआय,पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक,इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा यांचे खाजगीकरण होणार नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like