हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tollywood News : प्रभासपासून ते अनुष्का शेट्टीपर्यंत साऊथच्या या स्टार्सचे अजूनही लग्न झालेले नाही. चला तर मग जाणून घेउयात कि या यादीत आणखी कोण- कोणत्या स्टार्सची नावे सामील आहेत.
प्रभास
प्रभास हा संपूर्ण साऊथच्या चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली 2 रिलीज झाल्यानंतर तो संपूर्ण भारतातील स्टार बनला. मात्र त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या लग्नाबाबतही सतत चर्चा केली जाते. हा 42 वर्षीय अभिनेता अजूनही अविवाहित आहे. “लग्न कधी करणार ? असा प्रश्न विचारला असताअभिनेता म्हणतो कि, “जेव्हा माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असेल, तेव्हा मी निश्चितपणे याबाबत घोषणा करेन.”
अनुष्का शेट्टी
अनुष्का शेट्टीचे नाव अनेकदा प्रभाससोबत जोडले गेले. तसेच त्यांचे लग्न झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या ज्या नंतर खोट्या निघाल्या. अनुष्का आता 40 वर्षांची झाली असून तिचे चाहते अभिनेत्रीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्रिशा
दक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील आणखी एक लोकप्रिय चेहरा असलेल्या त्रिशाने वरुण मनियन या बिझनेसमनसोबत एंगेजमेंट केली होती. मात्र, याच्या काही काळानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. तेव्हापासूनच तिचे चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे लग्न कधी होणार आणि भाग्यवान मुलगा कोण असेल हे जाणून घेण्यासाठी वाट पाहत आहेत. Tollywood News
विजय देवराकोंडा
दक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सिंगल अभिनेत्यांपैकी विजय देवरकोंडा एक आहे. मागे एकदा तो आणि रश्मिका मंदान डेट करत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, मात्र त्या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
रश्मिका मंदान्ना
या यादीत जर विजयचे नाव असेल तर आपल्याला रश्मिकाबाबतही बोलावे लागेल. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाने रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता मात्र काही काळा नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता ती कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याची वाट तिचे चाहते पाहत आहेत. Tollywood News
हे पण वाचा :
Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार
ऋता दुर्गुळे पतीसोबत बीचवर सेलिब्रेट करतेय हनिमून; पहा फोटो
मौनी रॉयच्या मादक अदामुळे चाहते झाले वेडे