महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; जाणून घ्या आजची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली होती. मात्र आज १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राज्यात नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या मुंबईतील अर्ध्याहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. मुबंईत आतापर्यंत ८७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाचे दुसरे मोठे केंद्र बिंदू बनलेल्या पुणे शहरात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”