मुंबई ते पुणे अंतर होणार केवळ 90 मिनिटाचे; कसे ते पहा

trans harbour link
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हंटल की आपल्याला दिसतात त्या उंच – उंच इमारती, स्वच्छ, चकचकित रस्ते, सर्व पायाभूत सुविधानीयुक्त अशी ही मुंबई. मुंबई ही भारताची व महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. मात्र दोन्ही शहरातील ट्राफिक आणि प्रवासासाठीचा वेळ यामुळे हा प्रवास कंटाळवाणा होतो. मात्र आता हा प्रवास जलद होणार आहे. मुंबई पुणे अंतर केवळ 90 मिनिटात कापता येणार आहे. ते कसे ते जणू  घेऊयात.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक होणार नागरिकांसाठी खुला

मुंबईची कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. हा समुद्री पुलाचा मार्ग आहे. हा मार्ग नागरिकांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास अवघ्या 90 मिनिटात पूर्ण होणार आहे. हा मार्ग पुढच्या महिन्यात खुला केला जाईल अशी दाट शक्यता आहे.

22 किलोमीटर लांबीचा आहे पूल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा एक समुद्रावरील पूल आहे. त्याची लांबी ही 22 किलोमीटर इतकी आहे. सध्या यां पुलाचे 98% पर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 22 किलोमीटर पैकी आता 16 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, पुढच्या महिन्यात 25 डिसेंबरला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

18000 कोटींचा आहे खर्च

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल बांधण्यासाठी तब्बल 18000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा पूल देशातील सर्वात लांब समुद्री पूल म्हणून गणला जाईल. त्यामुळे मुंबई ट्रांस हार्बर लिंक 16.5 किलोमीटर लांब डेक  असलेला हा भारतातील पहिला पूल आहे. त्यामुळे याचे विशेष महत्व आहे. यां पुलामुळे पुणे, लोणावळा, खंडाळा ते मुंबई हा प्रवास 90 मिनिटात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे. तसेच या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सुलभ असा असणार आहे.

कसा असेल पुण्याला जाण्याचा मार्ग?

या पुलामुळे मुंबईवरून पुण्याला जाणारा मार्ग बदलणार आहे. भविष्यात हा मार्ग पि.डी.मेलो रोडवरून फ्रीवे म्हणजेच शिवडीच्या पुढे बाहेर पडावे लागणार आहे व त्यानंतर तुम्ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वरून पुढे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर चिरले मार्गाने प्रवास करू शकणार आहात. तसेच हा मार्ग गोव्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ हा वाचणार आहे. सध्या पुण्याला जाण्याचा मार्ग हा पी.डी. मेलो रोडवरून फ्रीवे व त्यानंतर सायन पनवेल द्रुतगती मार्ग या माध्यमातून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्यासाठी प्रवास केला जातो आहे. या  नव्या मार्गामुळे नक्कीच नागरिकांना फायदा होईल.