Trans Harbour Link | एकीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उदघाटनाची ओढ लागलेली असताना दुसरीकडे मुंबईतील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला करतील अशी शक्यता आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने हालचाली करत आहेत. त्यामुळे 12 तारखेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नागरिकांच्या सेवेत रुजू होणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार होणार अवघ्या 20 मिनिटात
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) हा पूल नागरिकांसाठी खुला झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणं शक्य होणार आहे. हा पूल देशातील सर्वात लांब पुलापैकी एक आहे. याची लांबी ही 22 किमी एवढी आहे. हा पूल जवळपास 18 किमी समुद्रातून जाणार आहे. त्याचप्रमाणे इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. त्यामुळे या पुलाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मुंबई – पुणे अंतर देखील होणार कमी
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यामुळे जसे मुंबई – नवी मुंबईचे अंतर कमी वेळात पूर्ण होणार आहे. तसेच या मार्गामुळे मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गाला हा मार्ग देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील कमी होण्यास मदत होईल. अशी आशा आहे. एवढेच नव्हे तर मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
काय आहे या मार्गाचे वैशिष्ट्य? (Trans Harbour Link)
हा समुद्री मार्ग असून यामुळे हा मार्ग पर्यावरणपूरक असा आहे. तसेच याच्या बांधकामासाठी जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग म्हणून गणला जाण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 25 मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या पुलाची रचना ही 60 मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मार्गाच्या उदघाटनासाठी सर्वचजन उत्सुक आहेत.