एसटीचं खासगीकरण होणार का? अनिल परब यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुंबईसह राज्यभर अद्यापही आंदोलन सुरु आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा विषय निघाला. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तो एक पर्याय आहे. विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल. सध्या मात्र तसा विचार केला नसल्याचे परब यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने केले जात असलेले आंदोलन हे आता नेतृत्वहीन झाले आहे. आंदोलनाबाबत चर्चा नेमकी कुणाशी करायची? कर्मचाऱ्यांच्यावतीने निर्णय कोण घेणार? याबाबत आम्हाला माहिती द्यावी. एसटी महामंडळाच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत काल जी बैठक झाली होती. त्या बैठकीत एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला. संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत.

एसटीच्या खासगीकरणाचा विचार करणार असल्याचे आम्ही सांगितले होते. मात्र आम्ही तो एक पर्याय ठेवला आहे. सध्या एसटीच्या स्थितीवरुन वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास केला जात आहे. येथील वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले वेतन याचा आढावा घेतला जात आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनवेळा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. आता आंदोलने करण्यापेक्षा चर्चा करा करणी आणि त्यातून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कामगारांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले.

Leave a Comment