हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Travel Insurance : जर रेल्वेने सतत प्रवास करणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या एका अप्रतिम सुविधेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या सुविधेची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, रेल्वेकडून 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये इन्शुरन्सची सुविधा मिळते. ज्यामध्ये प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे इन्शुरन्स कव्हर मिळते. मात्र ही सुविधा खास करून ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाच देण्यात येते.
IRCTC च्या वेबसाइटवर, तिकीट बुक करताना ‘Travel Insurance’ चा पर्यायाद्वारे हा लाभ मिळू शकेल. ज्याअंतर्गत जर रेल्वे अपघातामध्ये प्रवाशाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले आणि त्याच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल तर त्याला इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई दिली जाईल.
रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय ???
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून Travel Insurance ची सुविधा देण्यात येते. या सुविधेद्वारे, IRCTC कडून 1 रुपयांपेक्षा कमी किंमतींत प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर दिला जातो. मात्र याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना इन्शुरन्सच्या पर्यायावर जाऊन तिकीट बुक करताना काही तपशील भरावे लागतील.
ही सुविधा कोणाला मिळू शकेल ???
IRCTC कडून वेबसाइट किंवा अॅपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या सुविधेचा लाभ घेता येईल. मात्र, परदेशी नागरिकाला याचा कोणताही फायदा मिळणार नाही. हे जाणून घ्या कि, फ्लाइट तिकीट बुकिंग करणाऱ्या वेबसाइट्स कडूनही अशा प्रकारचा Travel Insurance दिला जातो, मात्र त्यांचे प्रीमियम खूप जास्त असतील.
हरवलेल्या अथवा चोरीला गेलेल्या वस्तूंसाठी करता येईल क्लेम
जर प्रवाश्याकडे रेल्वेचा ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल तर प्रवासादरम्यान त्याच्या मौल्यवान वस्तू आणि सामानाचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाईल. याशिवाय, अपघात झाल्यास उपचाराचा खर्च आणि मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या नॉमिनीला नुकसान भरपाई दिली जाईल.
किती पैसे मिळतील ???
रेल्वेच्या या ट्रॅव्हल इन्शुरन्स सुविधेअंतर्गत, रेल्वे अपघातामध्ये जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला अथवा कायमचे अपंगत्व आले तर 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. तसेच जर प्रवाश्याला अंशतः अपंगत्व आले तर 7.5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल. तसेच, जर गंभीर दुखापत झाली तर 2 लाख रुपये आणि किरकोळ दुखापत झाल्यास 10,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
अशा प्रकारे करा क्लेम
याअंतर्गत रेल्वे अपघात झाल्यानंतर प्रवाश्याला 4 महिन्यांच्या आतमध्ये क्लेम करावा लागेल. IRCTC द्वारे देण्यात येणाऱ्या या सुविधेसाठी Travel Insurance कंपनीच्या ऑफीसमध्ये जाऊनही इन्शुरन्स क्लेम दाखल करता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Bank Locker Rules : 1 जानेवारीपासून बँकेच्या लॉकरचे नियम बदलणार, आता ग्राहकांना मिळणार नुकसानभरपाई
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा