सांगली जिल्ह्यातील तीनही नगरपंचायतीत होणार तिरंगी लढत

0
71
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपणार असून त्यानंतर जरी या तिन्ही पंचायतीतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी साधारणपणे या तिन्हीही पंचायतीत निवडणूक तिरंगी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. शासनाने ओबीसींच्या जागेवरील निवडणुका स्थगित केल्यामुळे एकूण 39 जागांसाठी आता 213 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी व राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कडेगाव पंचायतीसाठी यंदा 13 जागांसाठी 58 अर्ज दाखल झाले आहेत. या पंचायतीत ना. कदम यांची कॉंगे्रस, आ. अरुण लाड यांची राष्ट्रवादी तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या भाजपमध्ये तिरंगी लढत होणार आहे. देशात आदर्श पंचायत म्हणून गौरविलेली खानापूर पंचायतीत सध्या 13 जागांसाठी 51 अर्ज दाखल झाले आहेत. या पंचायतीत शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर व विद्यमान सत्ताधारी सुहासनाना शिंदे यांनी एकत्र येऊन पॅनेल निर्मिती केली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार केले आहे. तर भाजपने गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार केले आहे. येथे ही तिरंगी लढत होणार आहे.

विधानसभेला तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या परंतु राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या केवळ कवठेमहांकाळ पंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीतील वर्चस्वावरून पुढील विधानसभेची गणिते जुळणार असल्यामुळे आ. सुमनताई पाटील तसेच भाजपचे खा. संजयकाका पाटील यांनी मोर्चेबांंधणी करण्यास सुरुवात केली आहे. या पंचायतीत 13 जागांसाठी 104 असे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here