नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्हा पुन्हा हादरला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला (accident) आणि हे सगळे सिलेंडर एकापाठोपाठ एक असे हवेत उडाले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव, ट्रक पलटी होऊन झाला स्फोट, हवेत उडाले सिलेंडर pic.twitter.com/VCW5TIsnsO
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 8, 2022
मनमाडपासून जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर हि भीषण दुर्घटना घडली आहे. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. या अपघातग्रस्त ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात (accident) ट्रक चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या बस अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला. दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाले आहेत. हि बस यवतमाळ येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात (accident) झाला.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!