राज्यातील सीताच जर असुरक्षित असतील तर राम मंदिर बांधून काय करणार ? तृप्ती देसाईंचा योगी आदित्यनाथांना सवाल

0
50
trupti desai yogi aadityanath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता तृप्ती देसाई यांनी थेट योगी सरकार वर निशाणा साधला.

तरुणीचा सामूहिक बलात्कार करून तिने कोणाचं नाव सांगू नये म्हणून तिची जीभ कापली जाते, तिचे सर्व अवयव काम करणार नाहीत अशी तिची अवस्था करण्यात येते, आणि जेव्हा त्या पीडितेचे कुटुंबीय पोलीस तक्रार करायला जातात तेव्हा त्यांची तक्रार कोणी लिहून घेत नाही , त्याचा तपास कोणी करत नाही. तब्बल 8 दिवसानंतर त्या आरोपींना अटक होते. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार नक्की करतय तरी काय ??असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/3289964534454284/

त्या पुढे म्हणाल्या, पालघर मध्ये जेव्हा साधूंची हत्या करण्यात आली तेव्हा याच योगिनीं पुढाकार घेतला होता,मग उत्तर प्रदेश मधील मुलींच्या सुरक्षेतते विषयी काय ?? असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला.

राम मंदिर तर बनलं पाहिजेच. आम्ही स्वतःही रामाचे भक्त आहोत .पण जर राज्यातील सीताच जर असुरक्षित असतील तर मग राम मंदिर बांधून काय करणार असा थेट सवाल त्यांनी योगी आदित्यनाथ याना केला आहे. तुम्ही आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री आहात मग त्या आरोपीचे पोस्टर कधी तुम्ही चौकाचौकात लावणार आहात, आणि फास्ट्रक्ट कोर्टात हा खटला जाऊन त्या आरोपींना कधी शिक्षा होईल ,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here