Twitter चा वापर करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा

Elon Musk Twitter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. भविष्यात ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना नव्हे तर व्यायसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे ते म्हणाले

इलॉन मस्क यांनी याबाबत ट्विट करत सांगितले की, ट्विटर नेहमीच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलरला विकत घेतले. एलोन मस्क ट्विटर चे व्यवस्थापन पूर्णपणे बदलू शकतात असेही म्हंटल जात आहे. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांनाते हटवू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. इलॉन मस्कला कंपनीमध्ये अनेक मोठे बदल करायचे आहेत, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवले जाणार असले तरी अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

ट्विटर एडिट बटण आणणार-

ट्विटर आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या ट्विटमधील चुका सुधारण्यात मदत करण्यासाठी एक एडिट बटण देण्याची योजना आखत आहे. एलोन मस्क यांनी या संदर्भात आग्रह केल्यानंतर ट्विटर लवकरच एडिट बटण सुविधा ट्विटर अँप मध्ये सुरु करण्याच्या तयारीत आहे.