Twitter चे नवीन फीचर, आता कोणत्याही अकाऊंटचे जुने ट्विट सहजपणे सर्च करता येणार

Twitter’s new features : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. ट्विटरने आपल्या फीचरमध्ये एक नवीन सर्च बटण जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या विशिष्ट युझरचे ट्विट सहजपणे सर्च करू शकाल. या नवीन फीचरमुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या विषयाशी संबंधित इतर ट्विट सहजपणे शोधू शकाल.

हे फीचर पहिले इंडस्ट्री कॉमेंटेटर मॅट नवरा यांनी पाहिले. सध्या हे फिचर फक्त काही युजर्ससाठी सुरू करण्यात आले आहे.

ट्विटरने म्हटले आहे की,’ ज्या युजर्सनी ट्विटरच्या ब्लू टिक सर्व्हिससाठी अ‍ॅप्लिकेशन केले आहे. त्यांना हे नवीन फीचर पहिल्यांदा मिळेल. हे फीचर नवीन लॅबसाठी उपलब्ध असेल असे ट्विटरने म्हटले आहे. सध्या लॅब सर्व्हिस कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आहे. लवकरच ही सर्व्हिस इतर देशांमध्येही सुरू होणार आहे.

सर्च करणे सोपे होईल
ट्विटरच्या नव्या फीचरमुळे जुने ट्विट सर्च करणे सोपे होणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही प्रदूषणावर एक विशिष्ट ट्विट पाहिले असेल मात्र आता ते आठवत नसेल तर हे नवीन सर्च बटण तुमच्यासमोर प्रदूषणाशी संबंधित ट्वीट्स आणेल. यापूर्वी ट्विटरने आणखी एक नवीन फीचर जारी केले होते. या फीचरच्या मदतीने, कोणीही साइन इन न करता Spaces ऑडिओ ऐकू शकतो. यासाठी कोणत्याही ट्विटर अकाउंटची आवश्यकता नाही.

इंटरनेटशिवायही व्हॉट्सअ‍ॅप चालेल
आता यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपला कोणत्याही डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये ऑनलाइन ठेवण्याची गरज नाही. Android आणि iOS युझर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर मल्टी-डिव्हाइस फीचर वापरु शकतील. आतापर्यंत युझर्स त्यांच्या स्मार्टफोनला त्यांच्या डेस्कटॉपशी लिंक करायचे आणि त्यांना त्यांचा स्मार्टफोन ऑनलाइन ठेवावा लागत होता.

पण आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना प्राथमिक स्मार्टफोनच्या गरजेशिवाय डिव्हाइस ऑनलाइन लिंक करण्याची परवानगी देईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक स्मार्टफोनशिवाय डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी नवीन फीचर देखील बीटा स्टेजमध्ये आहे, जे एक ऑप्ट-इन फीचर आहे ज्याला सेटिंग्ज मेनूमधील लिंक्ड डिव्हाइसेस पर्यायामध्ये ‘बीटा’ म्हणून संबोधले जाते. व्हॉट्सअ‍ॅपला लेबल लावले आहे.

You might also like