वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; दोन मित्रांचा कारखाली चिरडून मृत्यू

0
73
Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवसादिवशीच पानठेला चालक व त्याच्या मित्रावर काळाने झडप घातली. या कारमधील चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. या अपघातात पानठेलाचालकासह दोघेजण ठार झाले आहेत तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी मध्यरात्री खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथील महाराज लॉनसमोर घडली आहे.

या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे सुरेश उपेंद्र चौधरी आणि हर्षल रविशंकर बनोदे आहे. तर जखमींमध्ये नितेश पंचेश्वर,प्रतीक बनोदे,ऋषभ माटे यांचा समावेश आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी संकेत अशोक ढोक या कारचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण
सुरेशचा पानठेला आहे. रविवारी त्याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी सुरेश, त्याचे मित्र शुभम तिवारी, अभिषेक सिलम, ऋषभ माटे, प्रतीक बनोदे, नितेश पंचेश्वर व हर्षल बनोदे हे एमएच-४०- एझेड-१०५५, एमएच-४०- बीव्ही-०४०९ आणि एमएच-४०-बीएन-६५७७ क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून पाटणसावंगी येथे कॉफी व मॅगीसाठी गेले. त्यानंतर ते पार्टी करून मध्यरात्री परत येत असताना महाराज लॉनसमोर एमएच-३१- डीसी-८८२७ या क्रमांकाच्या भरधाव कारने एकामागून एक मोटारसायकलींना धडक दिली.

हि धडक एवढी भीषण होती कि एका मोटारसायकलीला कारने सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये सुरेश व हर्षलचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर बाकी तिघे जखमी झाले आहेत. हि कार संकेत अशोक ढोक हा चालवत होता. या कारमध्ये संकेतचा मित्र रवी वैष्णवसुद्धा होता. हे दोघेहि दारू प्यायले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संकेतला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here