दोन वर्षाच्या चिमुरडीचा अँपे रिक्षाच्या धडकेत मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रिक्षा पेटवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील कळंबे गावात अँपे रिक्षाच्या धडकेत दोन वर्षाच्या अणवी इंदलकर बालिकेचा जागीच मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ॲपे रिक्षा पेटवून दिली.

सातारा तालूक्यातील कळंब गावात एक दुर्दैवी घटना घडली. यात्रेनिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेऊन घरी परतना-या आज्जी आणि दोन नातवांना भरधाव वेगात आलेल्या अँपे रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन वर्षाच्या अनवी इंदलकर या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर आज्जी रुक्मिणी इंदलकर (वय ५८) आणि श्रावण इंदलकर हे दोघेही गंभीर जखमी झाले.

या आपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी अँपे रिक्षा पेटवून दिली. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यावेळी संपूर्ण रिक्षाने पेट घेतला होता. जखमी दोघांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपे रिक्षा चालक प्राण पवार याच्यावर तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.