… तर मीही आज गुवाहाटीत दाखल झालो असतो; उदय सामंत यांचे मोठे विधान

0
114
Uday Samant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदेच्या गटात दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान त्यांच्या गटात येण्याच्या ऑफर अनेक आमदारांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र मागील तीन दिवस रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. काल सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यामुळे ते नेमके कुठ गेले? अशी चर्चा केली जात होती. याबाबात सामंत यांनी मोठे विधान केले आहे. “मी आजही शिवसेनेत आहे. मी जर सेनेत नसतो तर मी गुवाहाटीला गेलो असतो, असे सामंत यांनी म्हंटले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदार फुटीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, अगोदरपासून मी शिवसेनेत आहे. आणि इथून पुढे राहणार आहे. मी जर सेनेत नसतो तर मी गुवाहाटीला गेलो असतो. मी आता गुवाहाटीत नाही तर पाली (रत्नागिरी) या ठिकाणी आहे. सध्या आमदारांच्या बंडखोरीमुळे सरकार अस्थिर असल्याचे म्हंटले जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही सगळे एकसंघपणे राहणे ही सगळ्याची जबाबदारी आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेतील ४० हून अधिक आमदार यात सहभागी झाले असले तरी उदय सामंत हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. आणि आपण मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पाठीशी ठामीपणे उभे राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती आपण पार पाडणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here