उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उद्या सकाळी याकार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी सोडताना उदयनराजे भोसले भावुक झाल्याचे समजते आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्या अशा आशयाचे वाक्य त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये टाकले आहे. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.” असे उदयनराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

 

उदयनराजे भोसले भाजपमध्ये चालल्याने राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात चांगलेच खिंडार पडले आहे. त्याच प्रमाणे राज्यात देखील उदयनराजे भाजपमध्ये जाण्याने राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीची कधीही नभरुन येणारी हानी असणार आहे.

Leave a Comment