सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मनोमीलन तुटल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणार्या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात खा. शरद पवार यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी आज ११ वाजता मुंबईत तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये शरद पवार याच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजेंचे मनोमीलन झाले आणि सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला. बैठकी दरम्यान, एकदिलाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले