समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांनासोबत घेऊन पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मला सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळाले ते खूप काही मिळाले. मला मुख्यमंत्री होण्यास शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. मात्र, आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मी काय करणार. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन बोलावे. त्यांनी थेट समोर येऊन सांगावे, मी लगेच माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसानंतर मी संवाद साधत आहे.”बोलण्यासारखं खूप काही आहे.  मला मुख्यमंत्री होण्यास शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. मात्र, आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मी काय करणार. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन बोलावे. त्यांनी थेट समोर येऊन सांगावे. त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच आपल्या पदाचा राजीनामा देईन. माझा मुक्काम मी वर्षांवरून हलवेन.

https://www.facebook.com/UddhavBalasahebThackeray/videos/357236179875942/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C

 

जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार आहे. मी नाटक करत नाही. मला मुख्यमंत्री पदाचाही लालसा नाही. मी राजीनामा देतो असे मी मिंट आहे हे नाटक नाही. माझ्यावर अविश्वासाचा ठराव येऊ नये म्हणून मी सांगतो कि समोर येऊन मला सांगावे. शिवसेना कदापि हिंदू आणि हिंदूत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आहे.

हिंदुत्व आमचा श्वास आहे, म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिल्या मुख्यमंत्री असेन, जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच हा निश्चय मनाशी बाळगून असतो. त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो आज सुद्धा समोर आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Leave a Comment