Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाजवणार; काय गर्जना करणार?

0
199
Uddhav Thackeray Dasara Melava
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray Dasara Melava) काय गर्जना करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन दसरे मेळावे होत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावाही याचवेळी बीकेसी मैदानावर सुरु आहे. यामुळे राज्यातील राजकारणात आता काही नवा ट्विस्ट येतो काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Uddhav Thackeray Live)

शिवसेनेच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील दसरा मेळ्याव्याकरता राज्यभरातून अनेक शिवसैनिक आले आहेत. मिळेल त्या वाहनाने गावागावातून शिवसैनिकांनी आज सकाळपासूनच शिवाजी पार्कवर गर्दी केल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक आज शिवाजीपार्कवर जमलेले आहेत.

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाजवणार; काय गर्जना करणार?