उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी विधान परिषद सदस्य नीलम गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे आणि अमोल मितकरी यांना उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाने आधीच चार उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कॉंग्रेसने दोन उमेदवार उभे करण्याचा विचार केला होता. त्यांच्या वतीने राजेश राठोड आणि राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. एकूण दहा उमेदवारांचा एक पराभव निश्चित होता. कारण सर्व उमेदवारांना विजयासाठी किमान 29 मतांची आवश्यकता आहे. हे लक्षात घेता शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुका आल्या तर स्वत: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर रविवारी रात्री काँग्रेस नेते बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचा एक उमेदवार आम्ही मागे घेत आहोत असे सांगत निवडणूक बिनविरोधच होईल असे सांगितले.

Leave a Comment