हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी “कोरोना काळात आपण केलेल्या कामामुळे आपले झालेले कौतुक काही जणांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ होते. त्याच्याकडून आरोप केले जातातायत. त्याचा नक्की इलाज करू,” असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून केला जातो. काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते. मग त्यांच्याकडून भ्रष्टाचार खणून काढण्याचे बोलले जाते.
माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी एवढत सांगतो कि, काय काढायचे ते काढा पण आपण जास्तीत जास्त सेवा देऊ शकलो. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ज्यांचे प्राण वाचले त्यांची संख्या ही आरोप करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणून आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांनाचा सरकारी आरोग्य केंद्रात अगदी फुटक तपासणी करुन देऊ. विरोधक आहेत म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका डायलॉगची आठवण करून दिली. सलमान खानच्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने थप्पड से डर नही लगता असे म्हटले आहे. आम्हा राजकारणातल्या लोकांचे नेहमी थप्पड देणे आणि खाणे हे आमचे आयुष्य आहे. त्यात कौतुक केलं की थोडी धडधड होते, असेही यावेळी ठाकरे याणी म्हटले.